मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते राजू शिंदे भाजपा सोडून शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने आज अखेर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.
यावेळी राजू शिंदे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजू शिंदे यांच्यासह इतर प्रमुख समर्थकांच्या हाती शिवबंधन बाधत पक्षात प्रवेश केल्याचे जाहिर केले.
राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असूनही स्थानिक पातळीवर भाजपामधून शिवसेना उबाठा पक्षात जाहिर प्रवेश करणारे राजू शिंदे हे मराठ्यातील कदाचित पहिलेच नेते असतील. यापूर्वी जळगांवचे भाजपा आमदार उमेश पाटील यांनीही ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपासोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, राजू शिंदे यांनी भाजपा सोडू नये यासाठी भाजपामधील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष तर कधी फोनद्वारे संपर्क साधून पक्ष न सोडण्याबाबत सूचना केली. मात्र राजू शिंदे हे आपल्या शब्दावर ठाम राहिले. राजू शिंदे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना उबाठा नेते चंद्रकांत खैरे यांनीही राजू शिंदे हे लोकसभा निवडणूकीत आले असते तर संदीपान भूमरे यांना मिळालेली मते मला मिळाली असती आणि माझा विजय झाला असता असे सांगितले.
आज छत्रपती संभाजीनगर येथील ‘शिवसंकल्प मेळाव्या’त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत उद्धवसाहेबांनी केले. ह्यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत… pic.twitter.com/rWszRrz98y
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 7, 2024
Marathi e-Batmya