अजित पवारांनी आव्हान दिलेल्या डॉ अमोल कोल्हे नी एक लाख मतांचा टप्पा पार केला अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी लोकसभा निवडणूका सुरु होण्यापूर्वी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना परत निवडूण येतोस कसा बघतोच म्हणून आव्हान दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी पहिल्या फेरीपसासून सातत्याने आघाडीवर राहिले. आतापर्यंत डॉ अमोल कोल्हे यांना १ लाख ११ हजार ७०४ मते मिळवित पुढे राहिले आहेत.

डॉ अमोल कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आतापर्यंत ९४ हजार ७७८ मते मिळाली आहेत. या दोघांना मिळालेली मते पाहता डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्या मतांपेक्षा १६ हजार ९९६ मतांची आघाडी आहे. विशेष म्हणजे सकाळी मतांची घेतलेली आघाडी डॉ अमोल कोल्हे यांनी अद्याप तरी टीकवून ठेवलेली आहे. त्यामुळे पुढील मतमोजणीच्या फेरीत अमोल कोल्हे आघाडी अशीच ठेवतील की शिवाजीराव आढळराव पाटील ही आघाडी तोडणार का याविषयीची उत्सुकता शिरूर वासियांसह राज्याच्या राजकारणात आहे.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *