चंद्रकांत पाटील यांची माहिती, बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत निर्णय

कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे,  कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी दिली.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची द्वितीय बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यस्तरीय बक्षीस : अनुक्रमे १० हजार, ५ हजार २ हजार ५००, १ हजार  असे असून  जिल्हास्तरीय बक्षीस: प्रथम  २ हजार, द्वितीय १ हजार, तृतीय ५०० तर चौथे २५० रुपये असणार आहेत

शासकीय रेखाकला परीक्षेच्या बक्षीस रकमेतील वाढ

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांसाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नवीन सुधारित बक्षीस रक्कम एकूण ₹४ लाख रुपये२० हजार एवढी असणार आहे.

शासकीय उच्चकला परीक्षेस मान्यता

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनमान्य अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे  तसेच वित्तीय नियमन आणि अर्थसंकल्प मंडळाच्या वित्तीय नियमावलीस तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे

शैक्षणिक शुल्क निश्चिती

विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील अभ्यासक्रमांचे तात्पुरते (Ad-hoc) शुल्क निश्चित करण्याचा अधिकार शुल्क निश्चिती समितीला देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर पदविका अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कला पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी आता तीन वर्षांचा करण्यात येणार आहे.तसेच कला शिक्षण संस्थांची संलग्नता सर्व शासनमान्य कला परिसंस्थांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मंडळाची संलग्नता घेणे बंधनकारक राहणार आहे.

फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

फोटोग्राफी अभ्यासक्रम यापूर्वी सर ज.जी. उपयोजित कला या संस्थेमध्ये सुरू होता. परंतु तो सध्या बंद आहे. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन फोटोग्राफी अभ्यासक्रम एक महिन्याच्या आत सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *