अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी छगन भुजबळ यांनी भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आणि त्यांची होत असलेल्या राजकिय अडचणीबाबत चर्चा केली. तसेच पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगत मंत्रि पदाच्या मुद्यावरून तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र छगन भुजबळ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून मंत्रीपद मिळणार नसेल तर ते भाजपाच्या कोट्यातून द्यावे अशी मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र या बैठकीनंतर छगन भुजबळ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या विशेषतः सध्या जे काही सुरु आहे. त्यावरूनही आमची चर्चा झाली. याव्यतीरिक्त सध्या अनेक मुलांना ज्या काही सुट्या लागलेल्या आहेत त्या अनुषंगानेही आमची चर्चा झाली. तसेच राज्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकिय प्रश्नीही आमच्यात चर्चा झाली. त्यावर फडणवीस यांनी मला आठ दिवसानंतर भेटा असे सांगितले आहे. या आठ दहा दिवसात योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, ओबीसीचे नुकसान होणार नाही असा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला जो का विजय मिळाला आहे तो ओबीसींमुळे मिळाल्याचे सांगत ओबीसी नेत्यांना सांगा की लगेच काही निर्णय घेऊ नका असे सांगितल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
यांनी टाळले असले तरी काही तासांच्या अवधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आणि माझी भेट झाली. या बैठकीत त्यांनी काही गोष्टींवर चर्चा केली. मात्र पुढील आठ-दहा दिवसात यासंदर्भात महायुतीतील नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. तसेच निवडणूकीत छगन भुजबळ यांची आम्हाला मदतच झाल असल्याचेही यावेळी सांगितले.
तर यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या दरम्यान झालेल्या भेटीसंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले की, हा आमच्या पक्षातील अंतर्गत मामला आहे. तो आम्ही पक्षाच्या पद्धतीनेच सोडवू असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.
दरम्यान ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून अधिकृत दूजोरा मिळू शकला नाही.
आज राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्याशी सामाजिक, राजकीय आणि सध्याच्या विविध घडामोडींविषयी सविस्तर चर्चा झाली.
यावेळी त्यांनी महायुतीच्या यशात ओबीसींचं पाठबळ महत्वाचं ठरल्याचं मान्य करत याबाबत आभार देखील मानले. तसेच ओबीसींचे कोणतेही… pic.twitter.com/9kvU8SNctA
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 23, 2024
Marathi e-Batmya