सिंह आणि वाघ एकत्र : दोघांच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या मूषक पूराणाला उत्तर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. आणि असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात २०१९ मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पूराणावर पलटवार केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तुमचे मूषक पुराण ऐकले. फारच चांगले होते. त्यामुळे तुम्ही चांगले पटकथाकार आणि संवाद लेखक व्हाल मी तुम्हाला सांगतो असे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला.

या उत्तराला प्रतित्तुर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील उभे राहत म्हणाले की, तुमच्याच माणसांनी उंदीर सोडले आहेत. तर आता राज्यातील जनता वाघ, सिंह आणि उंदरी या तिघांचा बंदोबस्त जनताच करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांवर कडी केली.

 

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत

आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *