शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखविला म्हणून मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार स्व.बाळासाहेबांच्या जंयतीदिनी शिवसेनेतर्फे भव्य सत्कार

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपण दिल्याची भावनिक आठवण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करून दिली जात होती. त्या शब्दानुसार शिवसैनिकास मुख्यमंत्री पदी बसविल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.
हा सत्कार सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात पार पडणार असून सत्कार सोहळ्याला 50 हजारहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी राजकीय नेते, उद्योजक, कलाकार उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यामुळे हा दिवस शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेना दिलेले वचन खरे करून दाखविले म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार असून एखादे दिलेले वचन पूर्ण करण्याची जिद्द कशी असावी हे या निमित्ताने शिवसैनिकांना कळावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

भाजपा, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नेत्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *