Rahul-Gandhi-Mallikarjun-Kharge

काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिरः मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी ४० स्टार प्रचारक

राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली असून आजच्या दिवशी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभेबरोबरच राज्यातील नांदेड पोट निवडणूकही जाहिर करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहिर करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून राज्यातील जनतेसाठी ६ नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून संविधान रॅली आणि आश्वासनांचा गॅरंटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातील एक कार्यक्रम मुंबई तर एक कार्यक्रम नागपूरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेने यादी जाहिर केली आहे. या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा, के सी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, सिद्धरामय्या, भुपेश बगेल, रेवंता रेड्डी, चरणजित सिंग चन्नी, डि.के.शिवकुमार, सचिन पायलट, रनदीप सुरजेवाला, डॉ जी परमेश्वरा, एम बी पाटील, कन्हैय्या कुमार, इम्रान प्रतापगडी, अल्का लांबा, के जे जॉर्ज, के जयकुमार, जग्नेश मेवाणी, नदीम जावेद, सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला या केंद्रीय नेत्यांचा स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश आहे.

तर या यादीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, आरिफ नसिम खान, प्रणिती शिंदे, सतेज बंटी पाटील, विलास मुत्तेमवार, अशोक भाई जगताप, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम या राज्यातील नेत्यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला.

स्टार प्रचारकांची यादी जाहिर

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *