शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार १२ हजार रूपयांचा अग्रिम कोणत्याही सणाला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सण अग्रिमात वाढ केली असून आता हा अग्रिम १२ हजार ५०० रुपये एवढा राहील.
१ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा सण अग्रिम अनुज्ञेय राहील. तो दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती) प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठी मिळू शकेल. हा आदेश दि. २३ ऑक्टोबर २०१८ पासून म्हणजेच शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून अंमलात आला आहे.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांचे निर्देश, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करा प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *