मुंबईनंतर वर्दळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन पुणे शहराच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षिय युवतीवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी राज्यातील राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र या घटनेची सविस्तर माहिती कळण्यास एक नाही दोन नाही तर तब्बल १२ तास लागल्याची माहिती पुढे आली असून या १२ तासानंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनास आदेश दिले.
वास्तविक पाहता अजित पवार यांची काम करण्याच्या पद्धतीबद्दल आणि त्यांच्या झोपेच्या आणि झोपेतून उठण्याच्या वेळा चांगल्याच राज्यातील जनतेला माहित आहेत. तसेच त्याबद्दलची माहितीही अजित पवार यांनी अनेकवेळा विविध कार्यक्रमातून बोलताना दिलेलीही आहे. अजित पवार यांचा रोजचा दिवस सकाळी ६ वाजता सुरु होत असल्याचे त्यांनीच अनेकवेळा सांगितले आहे. तसेच हातात असलेल्या कामाची माहिती आणि राज्यातील घडामोडींची माहितीही त्यांच्याकडून सर्वात आधी घेत त्याबर हुकूम देत असल्याचेही अनेकवेळा अनेकांनी पाहिले आहे.
अजित पवार यांची एकूण दिनचर्या पाहिल्यानंतर आणि पुणे हा शरद पवार आणि अजित पवार यांचा गड म्हणून पाहिले जाते. तसेच पुण्याचे पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील हे होते, त्यावेळी भाजपाबरोबर समझौता करत सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे मागून घेतले. असे असतानाही पुणे शहरातील स्वारगेट एसटी बस स्थानकात झालेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती मिळण्यास आणि त्यावर पोलिसांसह प्रशासनास आदेश देण्यास अजित पवार यांना १२ तास कसे लागले असा सवालही यानिमित्ताने निर्माण होत आहे. तसेच त्याची चर्चाही पुण्यात सुरु झाली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साधारणतः आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्विट करत “पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या असल्याची माहिती ट्विट करत दिली.
स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 26, 2025
Marathi e-Batmya