आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे मात्र मला यात पडायचे नाही. मात्र मंत्री पदासाठी मी ठाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना भवनातच पक्षप्रमुख म्हणूनच शोभून दिसतात असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लगावला यावेळी शिंदे भाजप सरकारात आपल्याला मंत्री पद हव आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे हे एक सज्जन माणूस आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून ते चांगले आहेत. सेना भवनात जसे ते शोभून दिसतात तसे ते मुख्यमंत्री म्हणून वर्षा निवासस्थानी शोभून दिसले नाहीत. हे दुर्दैव म्हणावं लागेल असा चिमटाही त्यांनी काढला.

२०१९ मध्ये शिवसेना भाजपा युती असताना अमित शहा यांनी शब्द पाळला नाही म्हणून महाविकास आघाडी उदयास आली यातील खरं काय याबाबत विचारता बच्चू कडू म्हणाले की, उद्धव ठाकरे खरे बोलले का शहा खरे बोलले हा संशोधनाचा विषय आहे. मी यात पडू ईच्छित नाही. तो माझा विषय नाही. परंतु उद्धव ठाकरे सेना भवनावर जसे शोभून दिसतात तेवढे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून दिसले नाहीत. हे आमच्या दुर्दैवी होते असेही त्यांनी म्हटलं आहे.

मंत्री पदा बाबत विचारता त्यांनी सांगितले की, मी राजकारणी समाज कार्य करावे लागते. तेव्हा मला मंत्री पदाची अपेक्षा आहे. ताकला जाऊन भांडे लपवणारा नालायक माणूस नाही असे सांगताना आमदार कडू यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मला मंत्रीपद हवं आहे.असे स्पष्टपणे सांगितलं आहे.

आमदार बच्चू कडू हे सोलापुरात करमाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक शिवसेना शिंदे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार कडू यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन,  व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *