पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी अद्याप तो अहवाल पाहिला नाही. मात्र तो अहवाल पाहिल्यानंतर मी माझे व्यक्त करतो असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
तर जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर सकल राज्य उत्पन्नाच्या वाट्यात महाराष्ट्राची १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर घसरण झाली असल्याचा निष्कर्ष आता खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच काढला आहे. महाराष्ट्राची गेल्या दशकभरात पिछेहाट झाल्याची बाब त्यांनी नोंदवली आहे. त्यामुळे विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही अशी खोचक टीकाही यावेळी सरकारवर केली.
सोशल मीडिया हँडलवरून जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की, २०१४ पासून ते आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक काळ भारतीय जनता पक्षाचे सरकार होते, महाराष्ट्राच्या या पिछेहाटीला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोपही यावेळी केला.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सकल राज्य उत्पन्नात गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. तेथील दरडोई उत्पन्न सुद्धा वाढले आहे. सर्वच राज्यांनी प्रगती करावी हे आमचे प्रामाणिक मत आहे. मात्र महाराष्ट्राच्या पोटावर पाय देऊन उद्योगधंदे, व्यापार डोळेझाकपणे गुजरातकडे वळवल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे अस सांगत पुढे म्हणाले की, या सर्व गोष्टींसाठी सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या लोकांना आता जनता घरी बसवल्याशिवय मागे हटणार नाही असा इशाराही यावेळी दिले.
दरम्यान, यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र अवेळी झालेल्या पावसामुळे अनेक पिकं हातची वाया गेली. मात्र आज पाडव्यानिमित्त अनेक वयोगटातील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यात शेतकरीही होते. यावेळी त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून ६ हजार रूपये मिळाल्याचे सांगत अती पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीची पिक विम्याची रक्कम मिळाली असल्याचे सांगतले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तशी काही तक्रार केली नाही. मात्र औद्योगिक उत्पादन राज्यात चांगले झाले आहे. तसेच राज्यातील पाऊसही चांगला झाला आहे. पण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने काय अहवाल दिला. तो काही मी अद्याप बघितला नाही. पण मी बघितल्यानंतर त्याबाबत माझे सविस्तर म्हणणे मांडणार असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya