जयंत पाटील यांचा टोला, राज्यात अनेक गंभीर समस्या, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्या

राज्यात पाणीटंचाई निर्माण होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक शनिवारी-रविवारी संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करत आहेत. याव्यतिरिक्त राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्यावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

जयंत पाटील बोलताना म्हणाले की, मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर असताना सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नावर कोणतेही ठोस धोरण तयार केले जात नाही. दीर्घकालीन टिकून राहणाऱ्या धोरणांचा अभाव आहे. स्वतःच्या सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी केवळ पळवापळवीचे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. त्यात महाराष्ट्राची अधोगती होत आहे असा आरोपही केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केवळ ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही अशा तालुक्यांचा यादीमध्ये समावेश केला नाही. इतके असतानाही पाण्याचे नियोजन कसे करायचे, यावर कोणतेही काम केले जात नाही. अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून वारंवार या गोष्टी मांडण्यात आल्या, पण नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले गेले अशी नाराजी व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांनो, आता तरी जागे व्हा असे आवाहन केले आहे.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, पाणी, वीज, बेरोजगारी, महागाई, महत्त्वाच्या सोयीसुविधा या प्रश्नांसह अन्य महत्त्वाचे मुद्दे मांडायचे असतानाही विरोधकांचीही गळचेपी केली जात आहे. राज्यात पाणीटंचाई निर्माण होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक शनिवारी-रविवारी संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करत आहेत. याव्यतिरिक्त राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्यावे. सत्ता टिकवण्यासाठी सर्व खेळ सुरू आहे, यांना सर्वसामान्य जनतेचे काही गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न पडतो आहे असेही म्हणाले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *