जयंत पाटील यांचा टोला, दावोसमधील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी लगावला.

याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, मोठी बातमी ! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकुण ५४ समंजस करार अशा स्वरूपाच्या दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या अशी खोचक टीकाही यावेळी केली.

उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार

जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींचा करार

हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करारा

या करारांचं पुढे काय झाले, प्रत्येक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट होवो इतक्याच शुभेच्छा असा खोचक टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *