मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याच सांगितलं कारण ? जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही मंगेश साबळेंनी सांगितलं

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची गाडी मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळची पहाटे फोडली. यावेळी गाडी फोडणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयानं सर्व आरोपींना ५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केली. सदावर्ते मराठा आंदोलनाचा वारंवार अपमान करत असल्यामुळे आपण सदावर्तेंच्या गाड्या फोडल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी मंगेश साबळे यांनी दिलीय. सदावर्ते यांच्या गाडया फोडणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंगेश साबळे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा हेतू नव्हता असा दावा साबळेंनी केलाय. मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरु आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण मराठा समाजा माजोरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सातत्याने बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्ते करतायत. म्हणून त्या व्यक्तीला चाप लावण्याचं काम आम्ही केलंय

About Marathi E Batmya

Check Also

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *