माणिकराव कोकाटे म्हणाले की, क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या धर्तीवर क्रिडा स्पर्धा आयोजित करा

जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, क्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति २०२५ धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावे, यासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. यामध्ये एक खेळ एक संघटनेचा प्राधान्याने समावेश करावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे क्रीडा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय बनसोडे, आमदार विजयसिंह पंडीत, आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे आणि स्काऊट गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, क्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा समावेश, शालेय व जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगितांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या धर्तीवर बालपणापासून शारीरिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, क्रीडा प्रोत्साहन संस्थांची निर्मिती करणे आदि विषयांचा समावेश करावा. तसेच, आमदार खेळाडू, नैपुण्य प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ यांचा क्रीडा धोरण समितीमध्ये समावेश करावा. तसेच, खेळाडूंचे याबाबत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात याव्यात, अशी सूचनाही केली.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *