मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या बाजू मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी वकिलांची फौज अधिक बळकट करण्यात आली आहे. मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रख्यात वकील कपिल सिब्बलही लढाई लढणार असून इंटरव्हिनर राजेंद्र डक यांच्या बाजूने सिब्बल मराठा आरक्षणासाठी युक्तीवाद करणार असल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ विधीज्ञ रफिकदादा सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मराठा आऱक्षणाची बाजू भक्कम मांडण्यासाठी उपसमितीची आज सकाळी शासनाचे वकील मुकूल रोहतगी व परमजीतसिंग पटवालिया यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya