मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादावर टिका करणाऱ्या मोदींवर मलिकांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच आमचा राष्ट्रवाद हा शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

मोदी यांनी नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद एक निव्वळ दिखावा आहे असे म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्याचा मलिक यांनी समाचार घेत आमच्या राष्ट्रवादामध्ये सर्व लोकांना घेवून जाण्याचा विचार आहे. तर तुमचा राष्ट्रवाद हा कुठेना कुठे मनुवादी विचारांनी भारलेला आहे. आमचा राष्ट्रवाद समता स्थापन करणारा आहे. राष्ट्रवादीच्या याच राष्ट्रवादाच्या ताकदीवर या देशातील लोकांना ताकद मिळाली आहे. आपण विशेष वर्गाला ताकद देणाऱ्या वर्गाची वकालत करत आहात. त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद कमजोर पडणार नाही. आमच्या राष्ट्रवादाने आम्ही उभे राहून खोटया राष्ट्रवादाला उखडून टाकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *