जयंत पाटील यांची खोचक टीका,…गैरवापर करणाऱ्यांवरच बजरंगबलीनेच गदा फिरवली कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला झालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपाच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले असेही सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, जनतेला भ्रष्टाचार आणि जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत असा जोरदार टोलाही लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

About Editor

Check Also

रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार

नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *