मुंबईः प्रतिनिधी
खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत!अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आधी मराठा व आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे स्पष्ट होते असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीचा इतका अभ्यास करुनही न्यायालयासमोर त्यांचे सरकार फेल कसे होते? असा सवालही त्यांनी केला.
Marathi e-Batmya