नागपूरः प्रतिनिधी
एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली.
महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले होते.
राहुल गांधी यांच्याविरोधात आम्ही काहीतरी करत आहोत हे पक्षाच्या अध्यक्षांना दाखवण्यासाठी सावरकर प्रकरण सापडल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
Marathi e-Batmya