शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा खोचक सल्ला, सदावर्तेनी आरएसएसचा गणवेश परिधान करावा प्रवक्ते महेश तपासे यांची गुणवरत्न सदावर्ते यांच्यावर टीका

महात्मा गांधींची सत्य व अहिंसा, शांती व सद्भावना हा सुविचार सबंध जगाने स्वीकारली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शासकीय कार्यक्रमात गांधी प्रतिमेसमोर पंतप्रधानांनाही नतमस्तक व्हावं लागतं व आरएसएसला खुलेआम गांधी विचारांचा विरोध करता येत नाही म्हणून गुणरत्न सदावर्ते सारखे काही एजंट आरएसएसने नेमले अशी घनाघाती टीका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सदावर्तेंवर केली.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नथुराम गोडसे यांची अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मान्य नव्हती हे सदावर्ते आरएसएस प्रेमी झाल्यामुळे विसरले आहेत व आता त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही अशी खोचक टीकाही केली.

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, भारतात दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्यांक सवर्ण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना राज्यात अशांती पसरण्याचा कॉन्ट्रॅक्ट सदावर्ते यांनी घेतला आहे अशी जहरी टीका केली.

वकील असून ज्यांना भारतीय राज्यघटना कळत नाही अशा सदावर्तनी वकिलाचा कोट काढून आरएसएसचा खाकी गणवेश परिधान करावा असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *