शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या प्रचारसभेतून उत्तर युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण

युक्रेनच्या विरोधात रशियाने सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात केंद्र सरकारला अपयश येताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत असल्याच्या यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यांबरोबर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे हे ही महत्वाचे काम असल्याचा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील भाजपाच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याची टीका करत राष्ट्रीय संकटाच्या वेळी राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

आमच्या गावांची एक ताकद अशी देखील आहे की जेव्हा संकट येते तेव्हा सर्वजण आपापल्या तक्रारी विसरून एकत्र येतात. मात्र देशासमोर एखादे आव्हान निर्माण झाले असेल, तर हे कट्टर घराणेशाहीवादी यामध्ये देखील राजकीय स्वार्थ शोधत असतात. भारताची जनता आणि सैन्य संकटाशी लढत असेल तर हे त्यांचा आणखी त्रास वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते पूर्ण ताकदीने करत राहतात. कोरोनाच्या काळातही आपण हे पाहिले आणि आज युक्रेन संकटकाळातही तेच पहात असल्याची टीका त्यांनी केली.

सतत विरोध, आंधळा विरोध, निराशा आणि नकारात्मकता ही त्यांची राजकीय विचारधारा बनली आहे. मला आनंद आहे की ज्याच्याकडे क्षमता आहे, तो राष्ट्रहितासाठी योगदान देत आहेत. आज भारताविरुद्ध काहीही झाले तर सर्व नागरिक एकत्र उभे राहतात. कोणी पंचायतीलाही मत देत नसेल तर देशाचे हित पाहून मतदान करा. तसेच, उत्तर प्रदेशमधील जनतेने गुंडगिरी, माफिया, भ्रष्टाचार, कट्टर घराणेशाहीवाद्यांना पूर्णपणे नाकारले असल्याचे ते म्हणाले.

आज एकीकडे डबल इंजिनचा दुहेरी फायदा आहे, ज्याचा लाभ युपीतील प्रत्येक नागरिक घेत आहे. दुसरीकडे, घराणेशाहीवाद्यांच्या कोरड्या घोषणा आहेत, ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. २१ व्या शतकातील हे तिसरे दशक संपूर्ण जगासाठी नवीन आव्हाने, अभूतपूर्व संकट घेऊन आले आहे. पण भारताने ठरवले आहे की, आम्ही या अभूतपूर्व संकटाचे आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करू. हा संकल्प केवळ माझा नाही, तर भारतातील १३० कोटी नागरिकांचा आहे, तो तुम्हा सर्वांचा असल्याचेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *