इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे सोडलेल्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी करून त्यांच्या मालकी हक्क, अभिलेख व त्यानंतर झालेल्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. महसूल …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, डहाणू-जव्हार आगाराला महिन्याभरात ३० नवीन बसेस दुर्गम आणि डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहचविणयाचे शासनाचे धोरण
पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आगारास महिन्याभरात ३० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू व जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर …
Read More »अश्लील नृत्यांवर कठोर निर्बंध आणत डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या म्हणण्यानंतर विधेयकास म
राज्यात ऑर्केस्टाच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील नृत्यावर कठोर निर्बंध आणणारे सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आता हॉटेल, उपहारगृहे आणि बारना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत मिळालेल्या ऑर्केस्ट्रा परवान्याच्या आधारे २०१६ च्या कायद्याअंतर्गत येणारे नृत्याचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. अशा आस्थापनांना २०१६ च्या कायद्यानुसार आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील आणि …
Read More »मुंबईतील ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील सोसायट्यांना सरकारचा दिलासा’ निवासीसाठी केवळ अर्धा तर व्यावसायिक मालमत्तांसाठी दीड टक्के मुद्रांक शुल्क, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई शहर आणि उपनगरातील ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींवरील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्थांची अनेक दशकांपासूनची कोंडी अखेर राज्य सरकारने फोडली आहे. भाडेपट्टा करार नोंदणीकृत करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात सरकारने ऐतिहासिक कपात केली असून, आता निवासी मालमत्तांसाठी जास्तीत जास्त ०.५ टक्का आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी १.५ टक्का एवढेच नाममात्र …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली माहिती
राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईटीएस (Electronic Total Station) सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, अत्याधुनिक मॉनिटरिंग व्यवस्था, कायद्यात सुधारणा आणि नवीन नियमावली आणण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभु यांच्या मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आरटीओतील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी दोषींवर कठोर कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही माहिती
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली असून, सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, जळगावमधील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा चूकीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन,निष्कासनाचीही प्रक्रिया करू
जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार ठोस कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, प्रभू रामाच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी? अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच ‘खास’ लोक; रामभक्ताच्या देणग्यांचा हिशोब द्या, काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचा नाशिकच्या काळाराम मंदिरातून शुभारंभ, ९ तारखेपासून राज्यभर सत्याग्रह
अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभू राम चरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये …
Read More »रामाच्या नावावर देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या भाजपा, आरएसएसच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत उद्या ७ तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरामधून आंदोलनाची सुरुवात
अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराला रामभक्तांनी लाखो करोडो रुपये दान स्वरुपात दिले. सोने चांदीचे दागिने दिले पण भक्तांनी दिलेल्या दान व देणग्यांवर भाजपा व रा. स्व. संघाच्या लबाड बगलबच्चांनी दरोडा टाकला आहे. हा केवळ पैसे अथवा देणग्यांवर टाकलेला दरोडा नसून श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरच टाकलेला दरोडा आहे. रामाला लुटणाऱ्या भाजपा …
Read More »
Marathi e-Batmya