राजकारण

आकाश फुंडकर यांची माहिती, श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार, उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रमांना चालना

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला या करारामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकूण २,४३०  दिवस या पदाची सूत्रे हाताळल्याने सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. शरद पवार यांना पाठी टाकत ते या क्रमांकावर पोहोचले आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे आणि २२१ दिवसांचे म्हणजेच एकूण २,४१२ दिवसांचे कामकाज हाताळले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी, शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करा शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी हे अभियान अभिनव ठरेल

शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा विवाह आणि विवाहाशी संबधित कामे खोळंबली

महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार …

Read More »

शिवसेना उबाठाचा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा विद्यार्थी आंदोलनाला महाराष्ट्रातून पहिली राजकीय मदत शिवसेना उबाठाची, सीजेपीच्या मोर्चात सामील

जवळपास मागील १५-१६ दिवस झाले, नीट परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन आणि वातावरणीय कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेसचे खासदार, कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी आणि काही कलावंतांनी स्वतःहून पुढे येत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कामगार कायद्यांमधील सुधारित बदलांनुसार व्यापक ‘कामगार हिताला’ प्राधान्य द्यावे विविध कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचे सादरीकरण

कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक ‘कामगार हित’ जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी?, प्रभू रामाच्या दानपेटीवर दरोडा टाकून भाजपाचे पोट भरले नाही म्हणून लाडक्या बहिणांनाही लुटले

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असा एकही विभाग अथवा क्षेत्र सोडले नाही जेथे भ्रष्टाचार केला नाही. ‘जाऊ तिथे खाऊ’ या म्हणीप्रमाणे केवळ भ्रष्टाचारच केला आहे. राम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजपा आरएसएसवाल्यांचे पोट भरले नाही म्हणून की काय त्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे. सत्तेतील सावत्र भावांनी बहिणींनाही सोडले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार ५०० जणांना नियुक्तीचे आदेश महर्षी वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन

सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी …

Read More »