राजकारण

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उबाठाला पाठिंबा चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी  शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …

Read More »

आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, लॉजिस्टीक पार्क भिवंडीसाठी जाहिर करा अर्थसंकल्पामध्ये भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्कची घोषणा करावी

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या गीग कामगारांना  सुविधा मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणावे तसेच भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्क जाहीर करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सोमवारी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, …

Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली मोदी, शाहची भेट पदभार स्विकारल्यानंतर मोदी-शाह यांची भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी आणि शहा यांच्यासोबतची ही त्यांची  पहिली भेट आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज १६% ने महाग होणार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट

राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,  अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम विकासवाडी येथील १२ हेक्टर ७६ आर जमीन देणार कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सांसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात  आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा अपघात रोखण्यासाठी परिवहन आणि पोलिसांना दिले कडक निर्देश

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले.अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली …

Read More »