राजकारण

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी नियोजनाच्या अभावावर व्यक्त केला संताप

गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेत ४०५ शाळा विकसित करणार विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार

राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेच्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत …

Read More »

काँग्रेस पक्षाची सोमवार ३० मार्चला सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार आहेत. पदयात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभूतपूर्व निर्णय

राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध्या केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या …

Read More »

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या रात्रीपर्यंत राजीनामा ? व्हिडिओचे सत्य समोर आल्यानंतरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेला असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ …

Read More »

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी” स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्काधारित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा उपलब्ध

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील तणावामुळे सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा वेगाने पसरत असून, त्यामुळे लहान व्यापारी आणि बाजारपेठांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे …

Read More »

विश्वास पाठक यांची माहिती, अखेर वीज दर कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बहुवार्षिक वीजदर आदेश दिला असून त्यामध्ये महावितरणच्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक अशा सर्व वीज ग्राहकांसाठी २०३० पर्यंत सलग पाच वर्षे टप्प्या टप्प्याने वीजदरात कपात होणार असून त्याबद्दल आपण …

Read More »

दिल्लीत दोन मामांची भेटः दत्तात्रय भरणे मामा आणि शिवराजसिंह मामा भेटले पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे. मात्र, या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्त्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा …

Read More »