पंकजा मुंडे यांनी घेतली या कारणासाठी फडणवीसांची भेटः मंत्री पदावर दोघांचा दावा विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी हुकली

मागील १० वर्षापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपामध्ये दिलेल्या राजकिय योगदानामुळे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांना भाजपाने उमेदवारी देत निवडणून आणण्यात मदतही केली. मात्र २०२४ लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्यातच भाकरी बदलवली. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे या पराभूत झाल्या. तर विधानसभा निवडणूकीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही भाऊ-बहिण एकत्र आल्याचे दिसले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय सोपा झाला.

मात्र राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार आल्यानंतर एकेकाळचे राजकिय प्रतिस्पर्धी असलेले फडणवीस- पंकजा मुंडे यांच्यात अखेर समेट झाला. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात २०१४ च्या धर्तीवर पुन्हा एकदा मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे यांना वाटत आहे. मात्र यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी आणि स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली.

वास्तविक पाहता पंकजा मुंडे यांची मंत्री पदावर विराजमान होण्याची इच्छा काही केल्या लपून राहिली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपा राज्यात सत्तेवर येईल असे वाटत नसतानाच राज्यात भाजपाप्रणित महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे भावासाठी विधानसभेच्या परळीतील जागेवर पाणी सोडणाऱ्या पंकजा मुंडे यांना आता मंत्री पदासाठी त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर राजकिय कुरघोडी करण्याची पाळी आली आहे.

धनंजय मुंडे हे जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी मंत्री पदाचे होताना त्यांचा प्राधान्याने विचार होणार आहे. मात्र दुसऱ्याबाजूला पंकजा मुंडे यांचा विचार नंतर कऱण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे वाटप होण्याआधी पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यंतरीच्या काळात ताणले गेलेल्या राजकिय संबधामुळे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांचा मंत्री पदासाठी कितपत विचार करतील याबाबत साशंकता असल्याचे भाजपाच्या गोटातूनच सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि बेरोजगारी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर भेट घेत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भेट घेत त्यांचे अभिनंदन केल्याचे पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आदेश, टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *