पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, फिनटेकमुळे ब्रॉडबँड वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ भारताने फिनटेकमध्ये प्रगती केली जगभरातून नागरिक पाह्यला येतात

देशात सध्या आर्थिक सण-उत्सवाचे दिवस असून बाजारात आणि आर्थिक क्षेत्रातही तसे उत्सवाचे वातावरण आहे. फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून सर्वचस्तरात मोठी क्रांती होत आहे. यापूर्वी देशातील विविधता पाहण्यासाठी परदेशात नागरिक येत होते. मात्र आता फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञानातून झालेली क्रांती पहायला पहायला येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुंबईत जीएफएएफच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. यावेळी आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे अधिकारी आणि तंत्रज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, संसदेत विचारणा केली जात होती की देशात अनेक भागात बँका नाहीत, एटीएम नाही, इंटरनेटचे जाळे नाही, अशा परिस्थिती डिजीटल क्रांती कशी होणार असा सवाल करत मात्र मागील दशकभरात ब्रॉडबॅड वापरणाऱ्यांच्या संख्येत ६० मिलीयनवरून ९४० मिलीयनवर पोहोचली असून फिनटेकमधील क्रांतीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतकेच नव्हे तर देशात कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले होते. परंतु देशातील बँकींग व्यवस्था ठप्प झाली नाही, त्याचबरोबर देशात सर्वसामान्य महिलांसाठी जनधन योजनंतर्गंत बँक खाते उघडण्यात आले, त्यास योजनेत १० वर्षेपूर्ण होत आहेत. या १० वर्षात २९ कोटी महिलांची बँक खाती उघडण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, फिनटेक क्षेत्राला मदत करण्याच्या उद्देशाने एंन्जल कर संपुष्टात आणण्यात आला असून आता हा विषय धोरण पातळीवर आणला असून त्या दृष्टीने धोरण तयार करण्यात येत आहे. मला फिनटेकच्या अॅथोरीटीकडून अपेक्षा असून डिजीटल साक्षरतेच्या माध्यमातून होणारे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी पाऊले टाकली जातील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिजीटल क्रांतीमुळे आज एकप्रकारची पारदर्शकता आणली असून सरकारच्या अनेक योजना या डिजीटलच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणल्या आहेत. त्या योजनांमधील आर्थिक गळतीला यानिमित्ताने आळा बसला असून या गळतीला रोखण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. आता तंत्रज्ञानामुळे नागरिक जवळ आल्याचे चित्र दिसत आहे. फिनटेकचा लाभ फक्त भारतापूरता मर्यादीत राहिला नाही, तर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचला असून त्याचा सामाजिक प्रभावही या निमित्ताने दिसून येत आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील अंतरही यामुळे कमी झाल्याचे दिसून येत असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *