दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

आज मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकसचंद्र रस्तोगी,उपसचिव अशोक मांडे, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई,तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा नुकताच निकाल जाहिर झाला. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *