कर्नाटकात विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनांची गॅरंटी दिली होती. मात्र कर्नाटक उमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच पैकी एक गॅरंटी बंद करण्याचे सुतोवाच दिले. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी “चुकीचा संदेश” दिल्याबद्दल कडक शब्दात कानउघाडणी केली. राज्य सरकारच्या महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या फ्लॅगशिप योजनेत सुधारणा केली जाऊ शकते, असा कथित सल्ला दिला. तोच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करत अवास्तव आश्वासने देणे सोपे आहे, परंतु त्यांची योग्य अंमलबजावणी करणे कठीण किंवा अशक्य आहे हे काँग्रेसला कळत आहे, अशी टोलाही यावेळी लगावला.
गुरुवारी बेंगळुरू येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत खर्गे म्हणाले, “तुमच्या पाच गॅरंटी पाहता मी महाराष्ट्रात पाच गॅरंटी जाहीर केल्या आहेत. तुम्ही (शिवकुमार) म्हणाले की आम्ही हमी योजनांपैकी एक बंद करू. तुम्ही वृत्तपत्रे वाचत नाही आणि जे काही कळवले आहे त्याबद्दल मी बोलत आहे. योजनेत सुधारणा करू असे सांगून तुम्ही शंका निर्माण केल्या आहेत. त्याचा (राज्यातील) विरोधकांना फायदा झाला आहे.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने २० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनाम्यात गॅरंटी जाहीर करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र युनिटला आर्थिक व्यवहार्यतेचा विचार करण्यास सांगितले आहे. “मी म्हटले आहे की त्यांनी अनेक गॅरंटीच्या घोषणा जाहीर करू नयेत. परंतु त्यांनी उपलब्ध बजेटच्या आधारे घोषणा करावी. अर्थसंकल्पाच्या पलीकडे जाणे आर्थिक समस्यांना कारणीभूत ठरेल, जर रस्त्यांसाठी निधी नसेल तर लोक संतप्त होतील, निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या गॅरंटी “वास्तववादी” आहेत याची खात्री करण्यासाठी पक्ष उत्सुक आहे.
पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले, आम्हाला १५ दिवसांपूर्वी अहवाल मिळाला असून आम्ही नागपूर किंवा मुंबईत घोषणा करू.
काँग्रेसवर टीका करताना, पीएम मोदी X वरील पोस्ट्सच्या मालिकेत म्हणाले, “मोहिमेनंतर प्रचारात ते लोकांना अशी वचने देतात, जी त्यांना हे देखील माहित आहे की ते कधीही पूर्ण करू शकणार नाहीत. आता ते लोकांसमोर वाईट रीतीने उभे आहेत! त्यांनी त्यांच्या पोस्टसोबत #FakePromisesofCongress चा वापर केला.
पंतप्रधान मोदी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आज हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा – ज्या राज्यात काँग्रेसची सरकारे आहेत ती पहा – विकासाची वाटचाल आणि आर्थिक आरोग्य खराब होत चालले आहे. त्यांच्या तथाकथित गॅरटी अपूर्ण आहेत, ही या राज्यांतील जनतेची घोर फसवणूक आहे. अशा राजकारणाचे बळी गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला आहेत, ज्यांना केवळ या आश्वासनांचा लाभच नाकारला जात नाही तर त्यांच्या सध्याच्या योजनाही कमी झाल्याचे दिसत असल्याची टीका केली.
In Karnataka, Congress is busier in intra-party politics and loot instead of even bothering to deliver on development. Not only that, they are also going to rollback existing schemes.
In Himachal Pradesh, salaries of Government workers is not paid on time. In Telangana, farmers…
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2024
तसेच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस पुरस्कृत खोट्या आश्वासनांच्या संस्कृतीपासून सावध राहण्याचे” आवाहन करत संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसला दिलेले मत हे “अशासन, खराब अर्थकारण आणि अतुलनीय लुटीला मत” असेल याची जाणीव निर्माण होत असल्याचेही यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कर्नाटकमध्ये, काँग्रेस पक्षांतर्गत राजकारण आणि विकासाची तसदी घेण्याऐवजी लुटमार करण्यात व्यस्त आहे. इतकेच नाही तर ते सध्याच्या योजनाही रोलबॅक करणार आहेत. हिमाचल प्रदेशात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. तेलंगणात शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. यापूर्वी, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांनी काही भत्ते देण्याचे आश्वासन दिले होते जे पाच वर्षांपर्यंत कधीही लागू झाले नाहीत. काँग्रेस कशी काम करते याची अशी असंख्य उदाहरणे आहेत, असल्याचेही पोस्टमध्ये टीका करताना लिहिले.
दरम्यान, कर्नाटकचे उमपुमख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले की, महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती योजनेत सुधारणा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. “शक्ती योजनेची पुनरावृत्ती सरकारसमोर नाही. काही महिलांनी बस प्रवासासाठी पैसे द्यायला तयार असल्याचे सांगितले. मला त्याची जाणीव नाही. मी तिथे नव्हतो. मी त्यांच्याशी (शिवकुमार आणि परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी) बोलेन, अशी सारवा सारव केली.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले की, त्यांचे वक्तव्य संदर्भाबाहेर घेण्यात आले आहे. “माझ्या विधानाला विपर्यास करण्यात आला आहे. मी एवढेच म्हणालो की, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आणि एमएनसी MNC कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांकडून वाहन भत्ता मिळत असल्याने तिकिटांसाठी पैसे भरण्यात स्वारस्य दाखवले आहे. याबाबत मी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. हमी योजना बंद होईल असे मी कधीच म्हटले नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार पुढे म्हणाले, पाच हमी योजनांपैकी एकही मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नको असलेल्या लोकांच्या घशात आम्ही हमी योजना जबरदस्तीने उतरवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सबसिडी स्वेच्छेने सोडण्याचे जाहीर आवाहन केले. मी एवढेच म्हणालो की असेच काहीतरी करता येईल. कर्नाटक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री या नात्याने मी पुनरुच्चार करतो की कोणतीही योजना कोणत्याही पद्धतीने मागे घेतली जाणार नाही. या योजना केवळ पुढील साडेतीन वर्षेच नव्हे तर काँग्रेस सरकारच्या पुढील कार्यकाळात आणखी पाच वर्षे सुरू राहतील असा विश्वासही यावेळी दिला.
Marathi e-Batmya