प्रचारासाठी गेलेल्या राहुल गांधी यांचा सभे दरम्यानच दोन वेळा स्टेज खचला बिहारच्या पाटलीपुत्र येथील घटना

लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहार येथील प्रचार सभेसाठी गेले होते. मात्र स्टेज प्रचारासाठी उभारण्यात आलेला स्टेज दोन वेळा खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणाला ईजा झाली नाही. मात्र प्रचारसभा तशीच पुढे सुरु ठेवण्यात आली आणि राहुल गांधी यांनी सभेत सभाही घेतली.

सातव्या टप्प्यात पंजाब, बिहार आदीसह काही लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी राहुल गांधी हे बिहारमधील प्रचारासाठी गेले. मात्र स्टेजवर काँग्रेसच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे उमेदवारांना राहुल गांधी यांनी जवळ बोलावताच पहिल्यांदा स्टेज खाली खचला आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्टेज खचल्याने काँग्रेस नेत्यांची जरा तारांबळ उडाली. मात्र सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही की, कोणी स्टेजवरून खाली पडले नाही.

त्यानंतर काँग्रेसची प्रचारसभा थांबविली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु राहुल गांधी यांनी सभेत संबोधित केले. या प्रचारसभेचा व्हिडिओही व्हायरल झाला.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *