डिआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यानंतर डॉ समीर व्ही कामत यांनाही वाढ

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २७ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अर्थात डीआरडीओ सचिव डॉ समीर व्ही कामत आणि संरक्षण संशोधन विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष यांना ३१ मे २०२५ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ३१ मे २०२४ पासून ३१ मे २०२५ अशी एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची मुदतवाढ मंजूर केली आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. डॉ सतीश व्ही कामत यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे २०२४ रोजी संपत होता. मात्र आता नियुक्ती समितीने डॉ सतीश व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ३१ मे २०२५ पर्यंत डिआरडीओचे अध्यक्ष म्हणून डॉ सतीश व्ही कामत हेच काम पाहणार आहेत.

१९८० मध्ये स्थापित, डिआरडिओ DRDO लष्करी उपकरणे आणि लॉजिस्टिकच्या वैज्ञानिक पैलूंवर सरकारला सल्ला देते आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांसाठी संशोधन, डिझाइन आणि विकास योजना तयार करतात.

About Editor

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना उद्देशून नाराज फुफा जी चा टोमणा गुजरातच्या वडोदरा येथे नमो फॉ विक्सित भारत कार्यक्रमात बोलताना केली टीका

विरोधी पक्षांवरील आपला हल्ला अधिक तीव्र करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सरकारच्या विकासकामांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *