मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या नारायणशी मिळती- जुळती वाक्ये शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो या मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावरून अंधारेंची टोलेबाजी

नुकतेच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळीत शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना मराठी चित्रपटातील नारायण वाघ या व्यक्तीरेखेशी केली.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वक्तव्ये काही वर्षापूर्वी आलेल्या ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील ‘नारायण वाघ’शी मिळतीजुळती आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासमोर जो नेता असतो, त्या नेत्याचं कौतुक एकनाथ शिंदे करतात, असा उपरोधिक टोलाही लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी सुषमा अंधारे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली.

यावेळी पुढे बोलतना सुषमा अंधारे म्हणाल्या, मला असं वाटतं की, शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्यावर कणभरही विश्वास ठेवला नसेल. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून मला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा ‘पार्ट -२’ आठवला. या चित्रपटात मुख्य व्यक्तीरेखा नारायण वाघ यांची आहे. तो ज्याला बघेल त्याला म्हणायचा, साहेब मी प्रत्येक क्षणी तुमचाच फोटो खिशात घेऊन फिरतो. तशी आमच्या एकनाथभाऊंची गत आहे.

एकनाथ शिंदे जेव्हा पंतप्रधान मोदींच्या समोर असतात, तेव्हा ते ‘हम मोदी के लोग है’ असं म्हणतात. कधी ते म्हणतात देवेंद्रजी या कलाकारामुळे माझं सगळं बरं झालं. आता ते शरद पवारांबद्दलही तसं बोलले. मला वाटतं, एकनाथभाऊंची ही सगळी वक्तव्ये… नारायण वाघची वक्तव्ये आहेत. यापलीकडे मला त्यावर अधिक वक्तव्य करावं वाटत नाही, असा टोलाही लगावला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *