महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर

दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेजबाबदार वक्तव्ये.

बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांचे शरद पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे. तर शरद पवारसाहेबांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचे महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. याची आठवणही महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना करुन दिली आहे.

जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले, त्यावेळी पवारसाहेबांनी शिवसेना- कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *