विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर चर्चा सुरु होती. त्याचबरोबर जागा वाटपाच्या प्रश्नांवरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेस अर्थात संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहिर होण्यात उशीर होत असल्याचे बोलले जात होते. त्यातच शिवसेना उबाठाकडून संध्याकाळी विधानसभा निवडणूकीतील ६५ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने घेण्यात येत असलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्या यादीत काही चूक आहे. त्यात प्रशासकिय चूका आहेत. त्यासंदर्भात अनिल देसाई पाहतील असे सांगत शिवसेना उबाठाकडून जाहिर करण्यात आलेली उमेदवारांची यादी पुन्हा एकदा तपासणार असल्याचे यावेळी जाहिर केले.
वास्तविक पाहता महाविकास आघाडीकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची माहिती मित्र पक्षांना देण्यात आलेल्या जागांची माहिती जाहिर करण्यात येणार होती. मात्र महाविकास आघाडीतील काही जागांबाबत एकमत न झाल्याने आज घेण्यात येणारी पत्रकार परिषद उद्या सकाळ पर्यंत ढकलण्यात आली. त्यातच आज संध्याकाळी शिवसेना उबाठा पक्षाकडून ६५ उमेदवारांची यादी आज संध्याकाळी जाहिर करण्यात आली. यातील काही मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे ठरलेले असतानाही शिवसेना उबाठा गटाने त्या जागांवरही उमेदवारांची नावे जाहिर केले.
त्यावर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांना जाहिर करण्यात आलेल्या यादी संदर्भात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरु होती. या बैठकी दरम्यानच शिवसेना उबाठाकडून उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. मात्र त्या यादीत काही चूक आहे. बघायला गेलं तर ती प्रशासकिय चूक आहे. ती चूक दुरुस्त न करताच ती यादी जाहिर करण्यात आली आहे. आमचे अनिल देसाई हे अशा गोष्टी बारकाईने बघतात, त्यामुळे अशी चूक झालीच कशी असे सांगत याबाबत पुन्हा सुधारणा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या चुका मित्र पक्षांच्या जागांवरही शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार दाखविण्यात आले आहे. त्या जागा शिवसेनाच लढविणार की मित्र पक्षांना सोडणार, त्यावर संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही त्या संदर्भात मित्र पक्षांशी उद्या चर्चा करणार आहोत. जर एकमत झाले नाही तर त्या जागा शिवसेना उबाठाच लढविणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शिवसेना उबाठा गटाची जाहिर झालेली हीच ती यादीः-


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
Marathi e-Batmya