महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी व सामाजिक कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित श्रीकांत शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री अनिस अहमद आदी उपस्थित होते.

उरण येथील भाजपाचे पदाधिकारी यशवंत म्हात्रे, आम आदमी पक्षाचे थॉमस मॅथ्यू, सामाजिक कार्यकर्ते जयेश ठाकूर, कृष्णा श्रीवास्तव, सेधुरमण अय्यर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

देशातील वातावरण बदलले असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ओघही वाढत आहे. दिवाळीची सुरुवात पक्षप्रवेशाचे फटाके फोडून झालेली आहे. आगामी काळात अनेक तरुण व उमदे नेतृत्व काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरोळे कुटुंबाचा काँग्रेस विचारांशी जुना ऋणानुबंध आहे, तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करू. पक्षाचा एका कार्यकर्ता या नात्याने काँग्रेस विचार घराघरात पोहचवण्याचे काम करू, असे रणजित शिरोळे यावेळी म्हणाले..

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ‘मेक इन महाराष्ट्र’कडून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’कडे वाटचाल

महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *