सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रातून काँग्रेस पक्षाला सल्ला, सावरकरांच कौतुक फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटीक्स-सुशीलकुमार शिंदे आत्मचरित्र पुस्तक

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा राजकिय बाज जितका महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील राजकारण्यांना जितका माहित नसेल तितका तो सोलापूरकरांना माहित आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सध्या राजकारणातून संन्यास घेत वानप्रस्थाश्रमाचे आयुष्य जगत आहेत. या कालावधीतच सुशीलकुमार शिंदे यांनी पाच दशकातील त्यांच्या राजकिय जीवनावर आत्मचरित्र लिहिले असून ते काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. या पुस्तकातून सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अस्पृष्य असलेल्या स्वा.वि दा सावरकर यांच्या कामाचे कौतुक करत काँग्रेस नेत्यांना मात्र भूमिका बदलण्याचा सल्ला दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे राजकिय जीवनातील अनुभवांवर आधारीत फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटीक्स सुशीलकुमार शिंदे नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. या पुस्तकात सुशील कुमार शिंदे यांनी सावरकर यांच्या दलितांसाठी सुरु केलेल्या अस्पृष्यते विरोधातील चळवळीचा उल्लेख करत सावरकर यांच्या विज्ञानवादी भूमिकेचे कौतुक केले. तसेच सावरकर यांचे अनेक पैलु होते असेही आपल्या पुस्तकातून सांगायला विसरले नाहीत.

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. ही यात्रा महाराष्ट्रातून जात असताना मै राहुल गांधी हू मै सावकर नही हू असे सांगत केंद्र सरकारने केलेल्या कारवाईला घाबरून मी माफी मागणार नाही नसल्याचे सांगितले. तसेच सावरकर यांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून सातत्याने सावरकर यांचा उल्लेख माफीवीर केला जातो.

मात्र या भूमिकेला थोडेसे बाजूला ठेवत सुशीलकुमार शिंदे यांनी सावकरांबाबत पक्षाने भूमिका बदलली पाहिजे असे मत मांडत काँग्रेस पक्षालाच सल्ला दिला आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशील कुमार शिंदे यांचा दाखला देत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काही तरी शिकावे असा उपरोधिक सल्लाही यावेळी दिला.

About Editor

Check Also

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *