सुनिल तटकरे- शरद पवार भेटीने खळबळ, भेटीच्या नावाने काय शिजतयं प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणे टाळले

राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात कार्यकारिणीमध्ये प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे नाव नसल्याने पक्षात गटबाजी उफाळून आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आसाम दौऱ्यावर असताना प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचे बरोबर प्रवास करणं टाळल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटीमध्येच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपलं मनोमत मांडल्याचे वृत्त आहे. गुवाहाटी दौऱ्यावर येताच  प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. भेटीमागे काय शिजतंय अशी चर्चा आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासमोर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीतून नावं वगळल्याच्या चर्चांनंतर नाराजी व्यक्त होत असल्याचं बोललं जात आहे. तसेच गुवाहाटी मध्ये एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत संबंधित प्रकरणाबाबत बोलणं झालं आहे. या भेटीत यादी कोणी बनवली, असा सवाल पटेल आणि तटकरेंनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. एकूणच या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षामध्ये नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलंय का, पक्षात गटबाजी झाली का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

गुवाहाटी दौऱ्यात सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीत आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक जेष्ट नेते  शरद पवार त्यांची सिल्व्हर ओक त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पक्षामध्ये फुट पडल्यानंतर काही वेळा शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं तेव्हा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करावी असे का वाटले नाही. मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीतून डावलल्याने शरद पवार यांची भेट घेतली की काय असे बोलले जात आहे. मात्र सुनिल तटकरे यांनी भेटीनंतर असे म्हटले आहे की, गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्याने काल ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता. असे तटकरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे.

एक्सवर पोस्ट करताना पुढे म्हटले आहे की, गेली सहा दशके साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे. असे तटकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षामध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे. त्या भेटीनंतर राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षात अस्वस्थ असल्याचा दावा केला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा राजकीय संकेत दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अस्वस्थ आहेत, ही केवळ चर्चा नाही तर वास्तव आहे. पक्षाने त्यांना डिमोट केले आहे. तसेच त्यांनी भाजपमधील काही नेत्यांनाही टोला लगावत, तुम्ही भाजप सोडून या, आम्ही स्वागत करू, असे वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही त्यांनी भाष्य करत, आमचा पक्ष भाजपसोबत विलीन होणार नाही असे रोहित पवार म्हणाले. सुनील तटकरे हे काल शरद पवार यांना भेटले. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. तीन वर्षानंतर तटकरे हे पवारांना भेटल्याचे म्हटले जात आहे. या भेटीवर रोहित पवार यांनी भाष्य केले. तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा, असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. तटकरेंना त्यांच्या अध्यक्षांना काही मॅसेज द्यायचा असेल असे भाष्यही रोहित पवारांनी केले.

सुनील तटकरे प्रफुल पटेल यांच्याविषयी आमदार रोहित पवार म्हणाले,  यांच्यासह राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजप मध्ये जाऊन विधानसभेची निवडणूक लढवणार असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे त्यांचा विषय आहे, पण त्या पक्षात अनेक नेते आहेत. कुणाचे नाव घेतले नाही आणि त्यामुळे कोणी दुखावत असेल, सकाळी धाडसी निर्णय आणि नंतर ट्वीट करून त्यात बदल करू असे म्हटले जात असेल, तर हा त्या पक्षाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

About Editor

Check Also

… आणि मुख्यमंत्री संतापले, अन काही तासात समस्या सुटली बेसा वसतिगृहात पोहोचले कुलर

आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *