सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर मधून सुरुवात आता एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती.

लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घेणार आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शहराला केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा सादर करावा मुंबईच्या वेशीवर ऑक्ट्रोयची नाके विकसित करा

बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *