महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारक बनवण्याकरिता इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय? असा सवाल करत मोठे मोठे रस्ते इन्स्ट्रक्चर प्रोजेक्ट राज्य सरकारचे होत आहे. पण इंदू मिल येथील स्मारक हे आपल्या सर्वांचं श्रद्धेच स्थान आहे. ते का पूर्ण होत नाही आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यायला पाहिजे अशी मागणीही केली.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे डबल इंजिनच्या सरकार मध्ये भारत सरकारचे आकडेवारी सांगत आहे की महिलांच्या विरोधातील गुन्ह्यात वाढ झाली आहे. राज्यात महिला असुरक्षित आहे. दिवसेंदिवस राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढले आहे हे वास्तव्य आहे. हे मी एक विरोधात म्हणून बोलत नाही तर केंद्र सरकारचे आकडे सांगत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने इंडिगोवर अॅक्शन घ्यायला हवी. ज्या पद्धतीने हजारो लोकांना गेल्या दोन दिवसांत अडचणी आल्या आहेत. आम्ही देखील संसदेत हा सर्व मुद्दा मांडला आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर अॅक्शन घेतली पाहिजे. सध्या इंडिगोच्या प्रवाशांना ज्या काही अडचणी येत आहेत, त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरणही दिलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा नेमकं कसा झाला? आधी कोणतीही सूचना न देता हा विस्कळीतपणा सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये आणि वेळ देखील वाया जात आहे. आम्हाला इंडिगोकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. पण आता केंद्र सरकारने इंडिगो सारख्या आणखी पाच कंपन्या तयार केल्या पाहिजेत. तसेच इंडिगोच्या सेवेला काय अडचणी आल्या आहेत? इंडिगोची सेवा अचानक विस्कळीत का झाली? त्यावर उपाय काय? याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली पाहिजे अशी मागणीही केली.
Marathi e-Batmya