मुंबई शिक्षक मतदार संघात जून २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते.
मा मुंबई उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची शहानिशा करण्यासाठी सुनावणी सुरू केली. मुंबई न्यायालयाने सुरू केलेली सुनावणी थांबवण्यासाठी ज मो अभ्यंकर यांनी सुप्रीम न्यायालयाने विशेष विनंती याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयात ७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या युक्तिवादा दरम्यान जे अभ्यंकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विपीन संघी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी नरसिंहा आणि न्यायाधीश ए चांदूरकर यांनी ज मो अभ्यंकर यांची विशेष विनंती याचिका रद्द करून मुंबई हायकोर्टात सुभाष मोरे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सुभाष मोरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमोल चितळे यांनी बाजू मांडली.
सुभाष मोरे यांच्या याचिकेत काय आहे?
मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल १ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणी दरम्यान घोषित उमेदवार जे अभ्यंकर यांना ३०७९ मते तर श्री सुभाष मोरे यांना ३०११ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ ६८ मतांचा फरक होता. हा फरक शेवटून दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या फेरीत २०८ मतापर्यंत गेला. श्री सुभाष मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत जे अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापकामार्फत ५८७ अपात्र मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला आहे. तसेच या अपात्र मतदारांमध्ये प्लेग्रुप, मॉन्टेंसरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि काही शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली आहे. काही मतदार असे आहेत की ज्यांचे वय १८ ते २५ वर्ष असून त्यांना किमान तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव नाही. आमदार अभ्यंकर सल्लागार असलेल्या अथवा विश्वस्त मंडळात असलेल्या शाळांमधून अपात्र मतदारांची नोंदणी झालेली असल्यामुळे अभ्यंकर यांची निवड रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सुभाष मोरे यांना विजयी घोषित करावे अशी मागणी याचिकेत केलेली आहे. उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून त्यांनी याचिकेद्वारे केलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचे मान्य केले आहे.
माजी आमदार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना माझी आमदार कपिल पाटील म्हणाले, उबाठा गटाचे आमदार अभ्यंकर यांनी वोटचोरी करून मुंबईतील शिक्षकांची फसवणूक केली आहे. ५८७ अपात्र मतदार वगळल्यास मुंबई शिक्षक मतदार संघातून सुभाष मोरे यांचा विजय स्पष्ट आहे. मुंबईतील शिक्षकांनी नेहमीच शिक्षक भारती संघटनेवर विश्वास दाखविला आहे. मुंबईतील शिक्षकांना हायकोर्टात न्याय मिळेल याची खात्री आजच मिळाली आहे.”
Marathi e-Batmya