निकालानंतर आशिष शेलारांनी लटकेंचे अभिनंदन करत म्हणाले, तर पराभव निश्चित होता

स्व.रमेश लटके यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेकरीता झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला. या निवडणूकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. अपेक्षेनुसार या निव़डणूकीत ऋतुजा लटके यांचा ६५ हजारहून अधिक मते मिळवित विजय झाला. या निकालानंतर भाजपा नेते तथा मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी ऋतुजा लटके यांचे ट्विट करत अभिनंदन केले. तसेच शेलार म्हणाले की, जर भाजपाने माघार घेतली नसती तर विजय निश्चित होता. त्यामुळे भाजपाच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांचा विजय झाल्याचा दावा केला.

गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. दरम्यान, आज या निवडणुकीचा निकार जाहीर झाला. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना ६५ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली असून दुसऱ्या क्रमांकाची मत ‘नोटा’ला मिळाली. या विजयानंतर ‘नोटाला गेलेली मतं ही भाजपाची होती’ असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत असताना आशिष शेलार यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर टीका केली.

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप यासारख्या डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही ठाकरे गटाला जास्त मतं मिळाली नाही. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता.

या निवडणुकीत ऋतुजा लटकेंना एकूण ६६ हजार २४७ मतं मिळली असून नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आहेत. तर १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *