Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, निवडणूकीचा कालावधी येईपर्यंत आपली बहिण आठवत नव्हती… हे सरकार गेल्यात जमा , वेळ पडली तर तर आंदोलनकर्त्यांबरोबर आंदोलन करतील

कोकणातील दौऱ्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महाअधिवेशनाला हजेरीही उद्धव ठाकरे यांनी लावली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता येते आणि जाते. पण गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार असून ती सर्वांच्या कल्याणासाठी वापरणार आणि सर्वांना न्याय देण्यासाठी वापरणार आहे. मला तुमच्या भविष्याची चिंता आहे. मला तुमच्या कुंटुंबाची पर्वा आहे. आज माझ्याकडे काहीही नसतानाही तुम्ही मला बोलावत आहातच ना असे सांगत पुढे बोलताना म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मी जुन्या पेन्शनच्या प्रश्नी आंदोलन करण्यासाठी मी तुमच्या सोबत आलो होतो. त्यावेळी तुमच्यासोबत आलेलाच एक जण तिकडे गेला आणि त्यांच्यातला होऊन गेला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतलं गेलं. जे फोडाफोडीचं राजकारण करण्यात आलं. ते फोडाफोडीच आंदोलन जुन्या पेन्शनसाठी करणाऱ्यांसोबतही करतील. हे सरकार गेल्यात जमा असल्याचं सांगत या महायुतीच्या नेत्यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे असा निर्धार केला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

राज्य सरकारकडून सध्या राबविण्यात येत असलेल्या माझी बहिण लाडकी योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळ येईपर्यंत ज्यांना आपली बहिण माहिती नव्हती, त्यांनी लाडकी बहिण योजना आणली. आता दोन महिन्यांनी निवडणूका आहेत. मी वचन देतो की, दोन महिन्यांनी आपलं सरकार आलं तर तुमची जूनी पेन्शन योजनेची मागणी लगेच मान्य करतो. आता मी ही घोषणा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना घाम फुटेल, आणि ते ही मागणी तात्काळ मान्य करतील. हा दगाफटका, तुम्हाला नाहीतर महाराष्ट्राला होणार असल्याची भीती व्यक्त करत ज्यांनी मी माझ्या कुटुंबातलं मानलं होतं, ते विश्वासघात करू शकतात, त्यांनी माझ्याशीही गद्दारी केली ते तुमच्यावर वार करू शकत नाही का असा सवाल उपस्थित करत म्हणून या सरकार नको, मुख्यमंत्री पदाचं स्वप्न मला तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही अशी खोचक टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला सत्तेतून कोणीही निवृत करू शकत नाही, मी सत्तेत असलो नसलो तरी जोपर्यंत जनता माझ्याबरोबर आहे. तोपर्यंत सत्ता आपल्याकडेच राहील असे सांगत जनतेची सत्ता असून जनता आणि सरकार वेगळं असलं तरी जनतेची सत्ता महत्वाची आहे. जनता हीच ताकद आणि जनता हिच माझी सत्ता असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *