नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाचे नेते रामदास कदम यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केला होता. त्या वक्तव्याला काही प्रसारमाध्यमातून प्रसिद्धीही चांगली मिळाली. मात्र रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम नेमके काय म्हणाले…
रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस ठेवला होता. तसंच त्यांच्या मृत्यूदेहाचे ठसेही घेण्यात आले होते असा गंभीर आरोप केला.
त्याचबरोबर रामदास कदम म्हणाले की, माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखाचं निधन कधी झालं ? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता ? याची माहिती काढा, मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेना प्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या, दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह द्धव ठाकरेंनी का ठेवला होता ? अंतर्गत काय चालंल होतं ? मी आठ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतं हे सगळं कशासाठी ? असा सवाल उपस्थित केला. रामदास कदम यांच्या या प्रश्नाला संजय राऊत आणि अनिल परब यांनी चोख उत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी काय प्रत्युत्तर दिले…
रामदास कदम यांच्या या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नमक हरांमाना आणि गद्दारांना उत्तर देत नाही. ठाकरे म्हणजे काय आहेत सगळ्यांना माहित आहेत. पण मी गद्दारांना आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. अशा प्रकारे आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, होय मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात, पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या वेदनांवर रामबाण उपाय झाला आहे, असं मला वाटतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठीशी आहेत. म्हणून तर मी उभा आहे असेही यावेळी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya