निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते मिलिंद रानडे आदी सहभागी होती.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग लाचार झालेला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा अधिकार हिसकावून घेऊन मतचोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मागे असलेल्या अॅनाकोंडा आहेच पण आता याच अॅनाकोंडाला कोंडायची वेळ आली असल्याचा टोला अमित शाह यांचे नाव न घेता लगावला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूका होण्याआधीच ते मतचोरीतून निकाल ठरवणार असाल तर त्या निवडणूका घेताच कशाला, आता लोकांनीच ठरवून द्या असा इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी एकाने सक्षम अॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तकार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी त्याची चौकशी करण्यासाठी आले. बरं तो चौकशी करणारा व्यक्ती कोण मग त्याला मी इथे आणलाय असे म्हणताच एकच उत्सुकता निर्माण झाली.
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तो व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असून त्याने ऑनलाईन अर्ज भरला आणि त्यातून व्हेरिफिकेशन अर्ज केला. मग आयोगाचे अधिकारी चौकशीसाठी आले, त्यांनी विचारले बोला म्हणून, मी त्यावर त्यांनाच विचारले मला काय वाटते ते मी का सांगु तुम्ही आलात तुम्हीच सांगा त्यावर त्या अधिकाऱ्यांनी एक ऑनलाईन अर्ज दाखवत म्हणाले की, तुम्ही अर्ज केला. त्यावर मी सांगितले की, त्यात दिलेला फोन नंबर चुकीचा आहे. तसेच त्या मोबाईल मंबरच्या माध्यमातून ओटीपी काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला. बरं मी अर्ज का करू निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मी सगळीकडे फिरतो, मी स्वतः एका पक्षाचे नेतृत्व करत असताना मीच माझा अर्ज कशाला करेन असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मतचोरी दिसली की तुमचा लोकशाहीचा दंडूका दाखवून द्या, मला कायदा हातात घ्यायचा नाही, जे काही करायचं आहे ते लोकशाही पद्धतीनेच करायचं असल्याचेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सगळे पुरावे मी आणि राज आता न्यायालयात घेवून जाणार आहोत. आता आम्हालाही बघायचे आहे की हे सगळं बघितल्यावर तरी न्यायालय तरी न्याय देईल का पण हे सगळे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, हे असं सगळं सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. मतचोरी केली जातेय, त्यांच्या माध्यमातून तेच सत्तेवर बसत आहेत, आता तुमच्या माझ्यावर हीच जबाबदारी आहे की, बोगस मतदारांना रोखलं पाहिजे, राज ठाकरेने सांगितल्या प्रमाणे आपणा प्रत्येकाला आपल्या आजू बाजूच्या लोकांवर लक्ष ठेवले गेले पाहिजे, त्याचे चेहरे पाहिले गेले पाहिजे. आम्हाला काही व्हायच आहे म्हणून ही लढाई लढत नाही तर लोकशाही इथल्या जनतेच्या हक्कासाठी राबविता आली पाहिजे यासाठी आपल्याला लोकशाही वाचवायची असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत मतचोरीच्या प्रश्नावर उत्तरे द्या अशी मागणीही यावेळी केली.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे आपलं काम झालं असे म्हणू नका, आम्ही दोघे एकत्र आलोय ते मराठी माणसासाठी आणि हिंदूत्वासाठी एकत्र आलोय. त्यामुळे तुमची जबाबदारी संपलेली नाही. तर ती आणखी वाढली आहे.
Marathi e-Batmya