विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..

महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीत गेलेले घटकपक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे. एकतर त्यांना गुलामगिरी करावी लागेल किंवा महायुतीतून बाहेर पडावे लागेल. महायुतीचा फॉर्म्यूला ठरला असला तरी ते जास्तीत जास्त जागा भाजपा स्वतःकडे ठेवणार आहे, असा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *