बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने बीअरच्या टाकीत केली लघुशंका बीअरच्या टाकीत कर्मचाऱ्याने केली लघुशंका; प्रसिद्ध कंपनीच्या फॅक्टरील धक्कादायक विडिओ समोर

संपूर्ण जगभरात महागडी बीयर स्टेटस म्हणून सिम्बल मानली जाते. पण काहीवेळा बीअर फॅक्टरीतील व्हिडीओ समोर येतात आणि किळस येतो. अशाच एका व्हिडीओनं सध्या खळबळ उडवली आहे. चीनमधील Tsingtao बीअर फॅक्टरीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओंमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मद्य तयार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं लेगर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाकीत लघुशंका केली. Tsingtao बीअर फॅक्टरीत काम करणारा कर्मचारी निळ्या रंगाच्या गणवेशात माल्टच्या टाकीवर चढताना दिसतो. त्यानंतर तो बीअर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाकीत लघुशंका करतो. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. माल्टची ती बॅच सील करण्यात आली असून तिचा वापर केला जाणार नसल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे उत्पादनाची गुणवत्ता कायम राखण्यासाठीचे प्रयत्न वेगानं सुरू केले असून कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ते नेहमीच्या वेगानं आणि क्षमतेनं सुरू आहे, अशी माहिती Tsingtaoनं दिली आहे. विशेष म्हणजे लघुशंका करणारा कर्मचारी नेमका कोणासाठी काम करतो तेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तो बीअरच्या कंपनीत काम करतो की कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीत याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

About Marathi E Batmya

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, भाजपाकडून संविधानावरील हल्ला अव्यातपणे सुरु इंडिया ब्लॉकच्या बैठकीत म्हणाले सर्व विरोधी पक्षांनी एकजूटी राहणे आवश्यक असल्याचे आवाहन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकशाही संस्थांना कमजोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *