काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान, मोदीजी, तुम्हाला जे करायचे ते करा. हवे तितके पोलीस बोलवा या लोकांचे मुख्य वैशिष्टये म्हणजे भ्याडपणा

गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी आणि आरएसएस (RSS) यांच्या विरोधात लढा देत आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला जसे पूर्णपणे – अगदी नखशिखांत – ओळखता येते, तसेच मी त्यांना ओळखतो असा उपरोधिक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर केली.

काँकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण दिल्लीला पोलिसांच्या स्वरुप दिले. तसेच रस्त्यावर दिसेल त्या तरूणाला, राजकीय नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ त्यांच्या एक्सवर पोस्ट केला.

तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, या लोकांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भ्याडपणा. या कथानकातील खलनायक – नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल – यांच्याभोवतीचा फास आता आवळला जात आहे. आम्हीच तो फास आवळत आहोत असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी, तुम्हाला जे करायचे ते करा. हवे तितके पोलीस बोलवा: १०,०००, २०,०००, ५०,००० किंवा त्याहून अधिक असे प्रति आव्हान देत सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा असेही यावेळी म्हणाले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही तुम्हाला चहूबाजूंनी घेरले आहे आणि आम्ही माघार घेणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा: आम्हाला हवी असलेली माहिती आमच्याकडे आधीच उपलब्ध असल्याचे गर्भित इशाराही यावेळी दिला.

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करणार आहोत. आम्ही भारतीय जनतेचा आवाज बुलंद ठेवणार आहोत. आणि गेल्या १०-१५ वर्षांत भारतासोबत जे काही घडले, ते पुन्हा कधीही घडणार नाही, याची आम्ही खात्री करणार आहोत असे सांगत भाजपाने घेतलेले निर्णय बदलणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

भारताच्या तरुणांनो, मला तुमचा अभिमान वाटतो. आपला लढा सुरू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगत तरूणांना विद्यार्थ्यांनाही राहुल गांधी यांनी आश्वस्त केले.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हे सरकार आणि ज्यांनी आमच्या संविधानावर हल्ला केला आहे, त्यांचा पराभव होईलच, हे आम्ही सुनिश्चित करणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानात हवेतच पॉवर बँकला आगः प्रवाशांमध्ये घबराट विमानाला हैद्राबादकडे वळविण्यात आले

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाचा मार्ग रविवारी हैदराबादकडे वळवण्यात आला; कारण विमानात एका प्रवाशाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *