सरकारचे आदेश ! विरोधकांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी हजर रहायचे नाही राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूवरून आता खऱ्या अर्थाने राजकारण सुरु झाले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. मात्र या दौऱ्यात सरकारकडून राहीलेली माहिती या विरोधी पक्षनेत्यांकडून उघडकीस येत असल्याने अखेर या विरोधी पक्षनेत्यांना अशासकिय सदस्य ठरवित त्यांच्या दौऱ्या दरम्यान आयोजित बैठकांना सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित रहायचे नाही असे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना आज दिले.

या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मतदारसंघाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा दर्जा देण्यात आलेले शासकिय पदाधिकारी यांनी बोलाविलेल्या बैठकांनाच सरकारी अधिकाऱ्यांनी हजेरी लावण्यास परवानगी दिली असून इतर मंत्र्यांचा दर्जा नसलेले विरोधी पक्षनेते, खासदार आणि इतरांनी बोलाविलेल्या बैठकांना हजेरी न लावण्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे उघडकीस येईल या भीतीपोटीच राज्य सरकारने अशा पध्दतीचे पत्रक काढल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

About Editor

Check Also

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, उपचारासाठी इम्रान खान यांना रूग्णालयात हलवा तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्याचे आदेश

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेले माजी पंतप्रधान इम्रान खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *