पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द पूर्ण करून बिहारला” आल्याचे सांगितले.

हल्ल्यामध्ये किमान २६ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एका दिवसानंतर, २४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झांझरपूर येथे आले होते आणि त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना “सोडणार नाही ” आणि त्यांना “त्यांच्या कल्पने पलीकडे त्यांना शिक्षा” करणार असल्याचे वक्तव्य केले होते.

त्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज जाहिर सभेत बोलताना “मी माझे शब्द पूर्ण करून पुन्हा बिहारमध्ये आलो आहे”, असे सांगितले.

भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पाकिस्तान आणि जगाने भारताची शक्ती पाहिली आहे… तो देशाच्या भात्यातून फक्त एक बाण होता… आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे”, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर दहशतवाद्यांनी पुन्हा आपले डोके वर केले तर भारत त्यांना बाहेर खेचून चिरडून टाकेल”, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “सासाराम येथील स्वाभिमानी आणि कष्टाळू लोकांना, जिथे देवता रामाच्या नावातच आहे, ते भगवान रामच्या राजवटीचे ब्रीदवाक्य जाणतात, “प्राण जाये पर वचन ना जाये आणि कोणत्याही किंमतीत दिलेला शब्द पूर्ण करावा लागणार”, असेही सांगितले.

रोहतासचे जिल्हा मुख्यालय असलेल्या सासारामसह बिहारच्या काही जिल्ह्यांमध्येही माओवादाच्या पूर्वीच्या धोक्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वी देशातील १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते, आता फक्त १८ जिल्हे शिल्लक आहेत आणि तो दिवस दूर नाही जेव्हा देशात माओवादी हिंसाचार संपेल. या भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीमुळे पूर्वी कोणतेही विकास काम किंवा प्रकल्प सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. परंतु आता गोष्टी पुढे सरकू लागल्या आहेत,असेही यावेळी सांगितले.

रेल्वेमधील नोकरीसाठी रेल्वे घोटाळ्यात विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि त्यांचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा सहभाग असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा ते सत्तेत होते आणि रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी रेल्वेमध्ये रोजगार देण्यासाठी तुमची जमीन बळकावली होती असा आरोप करत बिहारसाठी एनडीए सरकारने केलेल्या अनेक विकासकामांचा आणि उपाययोजनांचा उल्लेख केला आणि दलित, अत्यंत मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजातील पीडित वर्गाच्या दुर्दशेचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दलित, ईबीसी आणि ओबीसी लोकांकडे दशकांपासून बँक खाती नव्हती… हा काँग्रेस आणि राजदसाठी सामाजिक न्याय होता का? आता, जेव्हा हे लोक त्यांना (काँग्रेस आणि राजद) सोडून गेले आहेत तेव्हा त्यांनी ‘सामाजिक न्याय’चा वेगळाच सूर गाऊ लागले असल्याची टीकाही विरोधकांवर केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रगती करत आहे आणि आपल्याला बाबा साहेब आंबेडकर, जगजीवन राम, कर्पूरी ठाकूर आणि जयप्रकाश नारायण यांचा बिहार बनवायचा आहे, जेव्हा जेव्हा बिहारची प्रगती होते तेव्हा देशाची प्रगती होते असेही यावेळी सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील ४८,५०० कोटी रुपयांच्या रस्ते, रेल्वे आणि वीज संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यापूर्वी २९ मे रोजी, पंतप्रधान मोदींनी पाटणा विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे आणि बिहटा विमानतळावरील नागरी भागाचे उद्घाटन केले होते आणि रात्री उशिरा पक्षाच्या राज्य मुख्यालयात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी भेट घेण्यापूर्वी पाटणा येथे सहा किमीचा रोड शो केला.

केंद्रीय कॅबिनेट मंत्री गिरिराज सिंह, चिराग पासवान, राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह, नित्या नंद राय, जीर्तन राम मांझी यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, दोन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा आणि इतर वरिष्ठ नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वर्षी जानेवारीपासून मोदींचा निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या बिहारमध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा तिसरा दौरा आहे आणि ते २० जून रोजी पुन्हा राज्याला भेट देण्याची शक्यता असल्याची माहिती बिहार प्रदेशच्या भाजपा नेत्यांनी दिली.

About Editor

Check Also

Maharashtra Drought 2026 : सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ? सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

Maharashtra Drought 2026 : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *